अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पर्सनल असिस्टंट अरविंद देशमुख यांची आज यावल शहरात अचानक भेट.
राजकारणात चर्चेचा विषय.
यावल दि.५ ( सुरेश पाटील )
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पर्सनल असिस्टंट तथा जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक आणि भाजपाचे महामंत्री अरविंद देशमुख यांनी आज मंगळवार दि.५ रोजी दुपारी शिंदे गटाचे शिवसेना यावल शहर प्रमुख पंकज बारी यांच्या निवासस्थानी अचानक सदिच्छा भेट दिल्याने संपूर्ण यावल शहरात आगामी निवडणुका लक्षात घेता सकारात्मक चर्चेला उधाण आले आहे.
रावेर विधानसभा मतदार संघात भाजपाचे तरुण तडफदार, लोकप्रिय आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या निवडणूक कार्यक्रमात तत्कालीन मंत्री तथा विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पर्सनल असिस्टंट अरविंद देशमुख यांनी अत्यंत चाणाक्षपणे नियोजनपूर्वक महत्त्वाची भूमिका निभावली आणि त्यात त्यांना १०० टक्के यश मिळाले आहे. निवडणूक प्रचार यंत्रणेत त्यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे यावल शहरासह संपूर्ण रावेर मतदार संघात त्यांच्याविषयी एक आपुलकी निर्माण झाली आहे याच उद्देशातून त्यांनी आज यावल येथे शिंदे गटाचे शिवसेना यावल शहर प्रमुख पंकज बारी यांच्या निवासस्थानी आज दुपारी अचानक सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली यावेळी तालुक्यातील काही ग्रामपंचायत सरपंच,सदस्य यांच्यासह त्यांचे खास समर्थक आणि यावल शहरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी सर्वांसोबत स्नेह भोजनाचा आनंद सुद्धा घेतला.यावेळी त्यांच्यात नेमकी चर्चा काय झाली हे मात्र बाहेर समजले नसलेतरी संपूर्ण यावल शहरात आगामी निवडणुका लक्षात घेता राजकीय दृष्ट्या सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
