लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारीपदी गजानन टोम्पे यांनी स्वीकारला पदभार…!!
या पदावर अनेक अधिकाऱ्यांची होती फिंल्डिंग…!!
अनुजा कारखेले मॅडम ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारीपदी गजानन टोम्पे यांची नियुक्ती झाली आहे. तत्कालीन अधिकारी सत्यसाई कार्तिक यांची बदली झाल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून ही खुर्ची रिक्त होती. दरम्यान या पदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबत पोलीस प्रशासनाचं चांगलंच लक्ष वेधलं होतं. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील सहाय्यक पोलीस उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची सहा महिन्यांपूर्वी बदली झाली तेव्हापासून या ठिकाणी नियुक्ती होण्यासाठी मुंबई आणि पुण्यातून फिल्डिंग लावली होती. त्यामध्ये राज्यातील एका आमदारांच्या मेव्हण्याचे देखील नाव आघाडीवर होते. यात गजानन टोम्पे यांच्यासह अन्य अधिकारी देखील रेस मध्ये होते. अखेर गजानन टोम्पे यांची नियुक्ती करण्यात आली असून. दरम्यान टोम्पे यांनी यापूर्वी खेड उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या रायगड विभागात कार्यरत होते. पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या आदेशावरून त्यांनी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
