रत्नागिरीत सराईत अंमली पदार्थ विक्रेत्यांवर होणार मोक्काची कारवाई, रत्नागिरीत पोलिसांची कठोर भूमिका:- पोलीस अधीक्षक नितीन बगाटे.!!
कलावती गवळी ( रत्नागिरी जिल्हा ) प्रतिनिधी
अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक सक्षम प्रभावी होण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. फक्त पोलिसांनी केलेली कारवाई ही एकेरी ठरते, अंमली पदार्थाचा प्रश्न कायमचा संपवायचा असेल तर समाजानेही त्यांना पूर्णपणे नाकारले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रत्नागिरीत पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थ विक्री व तस्करी विरोधांत कठोर भूमिका घेतली असून. अशा गुन्ह्यांमध्ये वारंवार गुंतलेल्या सराईत आरोपींवर आता मोक्काची ( महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमन ) अंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. याशिवाय ज्या आरोपींवर आधीच गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर तडीपारांचे प्रस्तावही तयार करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे पुढे म्हणाले… अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आणि पुरवठा करणाऱ्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी रत्नागिरी पोलीस विभाग सातत्याने कारवाई करत आहे. गुन्हेगारांना कोणताही माफी नाही यापुढे फक्त कारवाईच नव्हे, तर कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी कठोर उपाययोजना राबवल्या जातील, अंमली पदार्थाच्या विकल्यात तरुण पिढी अडकत असल्याने अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली. पुरवठा करणारे नेटवर्क,स्थानिक वितरक आणि आर्थिंक साखळी यांचा तपशीलवर शोध घेतला जात आहे. अंमली पदार्थ विरोधी लढ्यात समाजाचा सहभाग महत्त्वाचा आहे. जनतेने अंमली पदार्थांना पूर्णपणे नकार दिला तरच लढा यशस्वी होईल, असे आव्हानही पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.
