करकिले सर, वायगावकर सर आणि कडपूरकर मॅडम यांचा सेवापूर्ती निमित्त लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते सत्कार संपन्न.
संपादकीय
लातूर :- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हरंगुळ (बु.) चे मुख्याध्यापक श्री करकिले रमाकांत विश्वनाथ सर आणि श्री वायगावकर जगदीश सारंगधर सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागझरी तसेच श्रीमती कडपुरकर अरुणा सतीश मॅडम सहशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागझरी यांचा सेवापूर्ती निमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हरंगुळ (बु.) येथील सभागृहात शनिवार दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी लोकाधिकारप्रमुख तथा हरंगुळ चे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे साहेब यांच्या हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला.
सेवापूर्ती निरोप समारंभाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरंगुळ चे माजी सरपंच तथा लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे हे होते.
तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लातूर पंचायत समितीचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी अशोकराव माणिकराव पाटील, विद्यमान केंद्रप्रमुख श्रीमती आचार्य नंदा मॅडम व भुईसमुद्रगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माजी मुख्याध्यापक लोखंडे गोरखनाथ मनोहर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयरा चे मुख्याध्यापक शेख फरीद दौलासाहेब हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव पनाळे आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने समारंभाचे अध्यक्ष व्यंकटरावजी पनाळे आणि प्रमुख पाहुणे यांचा शाल पुष्पहार देऊन केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांची यथोचित भाषणे झाली तर ज्यांची सेवापुर्ती आहे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यंकटराव पनाळे यांनी सांगितले की शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद वाढला पाहिजे. तरच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबू शकेल. ग्राम स्तरावरील लोकप्रतिनिधींचे जिल्हा परिषदेच्या शाळा विषयी आत्मीयता वाढणे आवश्यक असल्याचे सांगितले.
तसेच सेवापूर्ती होत असलेल्या शिक्षकांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो अशा शुभकामना दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंदे भास्कर सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेल्वे स्टेशन हरंगुळ यांनी केले. तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण माधुरी मधुकर मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती गाडे जे.डी., श्रीमती गिरी एस. डी., कुमारी गिरी नम्रता सुरेश (परिचर) यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सेवापूर्ती निमित्त आयोजित केलेल्या सत्काराच्या व निरोप समारंभाच्या कार्यक्रमास जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंतर्गत असलेल्या केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
