अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर लहुजी सेना यांच्या वतीने 105 किलो लाडू चिवडा वेफर्स आणि पाणी बॉटल वाटप,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर लहुजी सेना या संघटनेच्या वतीने सारसबाग येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भोसले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,
यावेळी संघटनेच्या वतीने 105 किलो लाडू वाटप, तसेच चिवडा वेफर्स आणि पाणी वाटप करण्यात आले होते,
यावेळी क्रांतीवीर लहुजी सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ खूडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई खंडाळे, यश भोसले, ज्ञानेश्वर भिसे, निकेतन चव्हाण, अजिंक्य कांबळे, ऋषिकेश शेंडगे आदि यावेळी उपस्थित होते
