अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शेतात काम करत असताना वयोवृद्ध महिलेवर बिबट्याच्या हल्ला जागीच मृत्यू
जळगाव जिल्हा प्रतिनिधी प्रवीण मेघे
जळगाव तालुक्यातील देवगाव शिवारात सोमवारी दिनांक 4 ऑगस्ट दुपारी भीषण घटना घडली गिरणा धरणा जवळी शेतात काम करत असलेल्या 73 वर्षीय इंदुबाई वसंत पाटील रा देवगाव या , वृद्धीवर बिबट्याने अचानक हल्ला चढवला या आल्यात गंभीर जखमे झालेल्या इंदुबाई यांचा, जागी मृत्यू झाला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली, असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटना दुपारी 12:30 वाजेच्यासुमारास घडली इंदुबाई पाटील या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत असताना बिबट्याने त्यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जबरदस्त चावा घेतला त्या गंभीर जखमी अवस्थेत शेतातच कोसळल्या त्याचवेळी शेजारी काम करणारे बाळू पूना पाटील व रमेश पौलादसोनवणेत्यांच्या लक्षात ही घटना आली त्यांनी तात्काळ पोलीस पाटील व त्यांच्या नातेवाईकांना माहितदिले घटनास्थळी बिबट्याचे पावलांचे ठसेही आढळून आले माहिती, मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि वनविभागाचे नितीन बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला इंदुबाई यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैधकीय, रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेमुळे देऊगाव सह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशीमागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे जळगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे
