मराठवाड्यातील फळबाग रोग प्रतिबंधक योजना अद्यावत करा.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू तालुका दबाब गटाची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी.
सेलू : मराठवाड्यातील फळबाग रोगप्रतिबंधक यंत्रणा राज्य सरकारने अद्यावत करावी अशी मागणी सेलू तालुका दबाब गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मराठवाड्यात मुख्यतः परभणी, जालना, संभाजी नगर जिल्ह्यात शेतकरी फळबाग शेतीकडे वळलेला आहे.मोसंबी, लिंबू, संत्री ई फळबागांची मोठ्याप्रमाणात लागवड तिन्ही जिल्ह्यांतील शेतकरी करत आहेत.मात्र गेल्या 3/4 वर्षांपासून या फळबागांवर बुरशी सदृश रोग पडत आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.याबाबत वारंवार कृषी अधिकारी जि प विभाग, कृषी विद्यापीठ परभणी यांच्या कडे शेतकरी वर्ग करत आहे मात्र त्यांना या बाबतीत ठोस उपाय योजना शेतकऱ्यांना सांगता आली नाही. विद्यापीठाच्या वतीने त्यावर संशोधन न केल्याने शेतकरी परेशान आहे.या रोगामुळे आलेला बहार गळती, लहान मोठे फळ गळती या प्रकारचे शेतकरी वर्गास नुकसान होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे व मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.. शेतकरी कर्जाचे विळख्यात सापडले आहेत या बाबत परभणी येथे असलेल्या कृषी विद्यापीठात चालू असलेला संशोधन केंद्र यावर गेले अनेक वर्षांपासून ठोस उपाययोजना सुचवू शकली नाही.ही अत्यंत शर्मनाक बाब आहे कदाचित तेथे अपुरी यंत्रणा असावी अथवा केंद्रात काम करणारे सक्षम संशोधक नसावे त्यामुळे यावर आजवर ठोस उपाययोजना सापडली नसावी.हे संबंधित विभागाचे,कृषी खात्याचे अपयश म्हणावे लागेल.असे दबाब गटाने मुख्यमंत्री यांना पाठवलेले निवेदनातून नमुद केले असून या बाबीकडे विशेष लक्ष देऊन संशोधन विभाग तात्काळ सक्रिय व अद्यावत करावा. त्या साठी ईतर विभागातील कृषी विद्यापीठ व संशोधकांची मदत द्यावी. मोसंबी,संत्रा व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. अशी अपेक्षा दबाब गटाने व्यक्त केली आहे.या निवेदनावर श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ,इसाक पटेल,सतिश काकडे,गुलाब पौळ,देवराव दळवे,योगेश सुर्यवंशी,अजित मंडलीक, विकास गादेवार, भाऊराव सोनवणे,दिलीप मगर, मुकूंद टेकाळे, भारत झाल्टे,दत्ता कांगणे, सुधीर आधाव,भारत रवंदळे,रामचंद्र कांबळे,लिंबाजी कलाल,गणेश मुंढे,रौफ भाई, जलाल भाई,अक्षय बुरे, ज्ञानेश्वर लेवडे,राजेश बरसाले, बापूराव चट्टे,शिवाजी चव्हाळ,परमेश्वर कादे,सुभाष काकडे,नारायण पवार, उध्दव सोळंके, गणेश सोळंके,त्रिंबक तारडे, रामेश्वर शेवाळे,दिलीप शेवाळे,विलास रोडगे, सदाशिव निकम,तुकाराम मगर पांडुरंग आवटी,आबासाहेब भुजबळ,लक्ष्मण प्रधान आदिचे सह्या आहेत.
