अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती…
सत्ता पक्षामध्ये वाढती गर्दी लक्षात घेता कार्यकर्ते झाले सैरभैर.
वार्ताहर / मानवत
पाथरी ९८ विधान सभा मतदार संघात विरोधी पक्ष नावाला शिल्लक राहिला नाही. अनेक जन सत्तेत गेले तर अनेक जन जाण्याच्या मार्गावर असल्यामूळे कार्यकर्त्यासह पदाधिकारी सैर भैर झाले आहेत.
विरोधी पक्ष नसल्याने *विठ्ठला Ssss कोणता झेंडा घेऊ हाती* असा आर्त टाहो फोडण्याची पाळी आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यावर आली आहे.
आजी माजी नगरसेवक कोणत्या पक्षात जाणार ? असा प्रश्न प्रभागातील लोकप्रतिनिधींना पडला आहे. त्यामुळे शहरामध्ये राजकीय चर्चाला उधान आले आहे.
९८ पाथरी विधान सभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत निवडणूकीचे पडघम वाजण्यास सूरूवात झाली असल्यामूळे वातावरणात रंग भरत आहे. मानवत नगर परिषदेच्या विविध प्रभागातील क्रमांकामध्ये आजी, माजी नगर सेवक यांच्या राजकीय वाटचाली बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर अनेकामध्ये उत्सुकता वाढली आहे. ते कोणत्या पक्षात प्रवेश करावा. याची चर्चा सध्या कार्यकर्त्यासह नागरिकांमध्ये चर्चेला जोरात उधान आले आहे.
आजी माजी पदाधिकारी यांचे समर्थक मानले जाणारे मात्र अनेकांनी सत्तापक्षात प्रवेश केल्या नंतर, तर दुसरीकडे माजी पदाधिकारी यांनी आता कोठे जाणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. तर *बा ! विठ्ठला Ssss कोणता झेंडा घेऊ हाती.* अशी म्हणण्याची पाळी आली आहे. ९८ पाथरी विधान सभेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या निर्णयाकडे प्रभागातील जनतेचे लक्ष लागले असून, येणारी निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.
