अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादक संतोष लांडे
खुनाच्या गुन्हयातील आरोपी १ तासाच्या आत ताब्यात
दिनांक २/८/२०२५ रोजी रोजी रात्रौ ९.०० वाजण्याचे सुमारास मौजे मंचर ता. आंबेगाव जि पुणे गावचे हद्दीत मंचर नगर पंचायतजवळील नंदीनी परमिट बारचे समोरील रोडवर इसम नामे शहाजी वामन इंदोरे, सचिन सुदाम इंदोरे, प्रतिक शिवाजी इंदोरे सर्व रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव जि पुणे यांनी संगनमत करून कोणत्यातरी अज्ञात कारणावरून इसम नामे प्रशांत रविंद्र गांजाळे वय ४४ वर्षे रा. एस कॉर्नर, गांजाळेमळा, मंचर ता. आंबेगाव नि पुणे यांचेसोबत भांडण करून भांडण चालू असताना शहाजी वामन इंदोरे याने त्याचेकडील कोणत्यातरी धारदार हत्याराने जिवे मारण्याचे उद्देशाने प्रशांत गांजाळे यांचे गळयावर भोसकून प्रशांत गांजाळे याचा खुन करून वरील तिनही आरोपी पळून गेले होते. मा. पोलीस अधिक्षक अधिक्षक सो, सो, श्री संदिप गिल्ल, मा. अपर पोलीस अधिक्षक सो, श्री रमेश चोपडे सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो श्री अंमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी तात्काळ मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची पथके तयार करून आरोपींचे अटकेबाबत योग्य सुचना व मार्गदर्शन तपास पथके रवाना केल्याने तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ०१ तासाच्या आत खुन करून पळून गेलेले इसम नामे शहाजी वामन इंदोरे, सचिन सुदाम इंदोरे, प्रतिक शिवाजी इंदोरे सर्व रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव नि पुणे यांना अवसरी येथून ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणलेले आहे. सदर इसमांकडे चौकशी करून त्यांना गुन्हयात अटक करून पुढील तपास करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक सो श्री संदिप गिल्ल, मा. अपर पोलीस अधिक्षक साो, श्री रमेश चोपडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो श्री अमोल मांडवे, मा. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे, पोलीस उपनिरीक्षक यशवत यादव, सहा. पोलीस निरीक्षक राजेश नलावडे, सहा. पोलीस निरीक्षक गणपत डावखर, पोलीस हवालदार नंदकुमार आढारी, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस हवालदार सुदाम घोडे, पोलीस हवालदार हगवणे, पोलीस अंमलदार योगेश रोडे, अविनाश दळवी, हनूमंत ढोबळे यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर हे करीत आहेत.
