अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
हिंगोली श्रीहारीअंभोरे.पाटील ऑगस्ट, 2025
नवतंत्रज्ञानाच्या आधारे महसूल विभागाची
कार्यक्षमता वाढविण्यावर प्रशासनाचा राहणार भर
हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
अधिकारी -कर्मचा-यांचे सेवापुस्तक आता ऑनलाईन मिळणार
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महसूल सप्ताहास सुरुवात
हिंगोली, दि. 01 (जिमाका): बदलत्या काळानुसार लोकहिताची कामे करताना महसूल विभागासमोर नवनवी आव्हाने उभी राहत आहेत. त्या आव्हानांवर मात करण्यासाठी नवतंत्रज्ञानाच्या आधारे महसूल विभागाची कार्यक्षमता वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाने भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे आणि सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संजय सुंकवाड उपस्थित होते.
महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ‘महसूल विभागाच्या सर्व पातळ्यांवरील समित्यांमधून जिल्ह्याच्या प्रशासनात विश्वासार्हता निर्माण झाली असून, त्यामागे खात्यातील प्रत्येक अधिकाऱ्याची निष्ठा आणि सेवाभाव आहे.’ अशा शब्दांमध्ये महसूल खात्याच्या कार्यक्षमतेचे आणि नवोपक्रमांचे त्यांनी कौतुक करत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. प्रशासनाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हिंगोली जिल्हा ई-फेरफाराच्या नोंदी घेण्य
