अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ध्येय फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
आपल्या कर्तुत्वाने शिक्षणक्षेत्रात दीपस्तंभ निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील 365 ध्येयनिष्ठ शिक्षक व 36 शाळांचा होणार राज्यस्तरीय सन्मान
ध्येय एजुकेशन फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे उपक्रमशील शिक्षकांचे 28 सप्टेंबर 2025 रविवार रोजी ग. दि. माडगूळकर सभागृह निगडी आकुर्डी पुणे येथे सकाळी 10:30वाजता शिक्षण संमेलन आयोजित केले आहे.
गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील आपले सर्वस्व अर्पण करणारे ध्येयनिष्ठ शिक्षक शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण करू इच्छितात अशा शिक्षकांना एकत्र आणून त्यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम जगासमोर यावेत.
ध्येयनिष्ठ शिक्षकांचा एक सुवर्णक्षण म्हणून महाराष्ट्राचे सह्याद्री शिक्षक आयकॉन या नावाने पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळांचे ध्येय पुस्तिका प्रकाशन करण्याचे निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नवनवीन संकल्पना, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे महाराष्ट्रातील खरे ध्येयनिष्ठ शिक्षक समाजासमोर यावे यासाठी महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील 365 शिक्षक 36आदर्श शाळा 6 गटसाधन व्यक्ती यांना राज्यस्तरीय तर 2 राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्याचे आयोजित केली आहे.
ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन च्या माध्यमातून या सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळा महाराष्ट्रासाठी आदर्शवृत्त व प्रेरणास्त्रोत ठराव्यात यासाठी विविध उपक्रम या शाळेत राबवण्यासाठी विविध माध्यमातून शाळांना सहकार्य करण्यासाठी शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी या संमेलनात पुरस्कार प्राप्त शाळा व शिक्षकांना सन्मानचिन्ह , सन्मानपत्र , वर्ग व शाळा विकासासाठी काही निधी उपलब्ध करून दिला जाईल व तसेच ध्येय फाउंडेशनचे सदस्यत्व दिले जाणार आहे.
या संमेलनासाठी आदरणीय शिक्षण मंत्री, आदरणीय उच्च शिक्षण मंत्री, समाज सेवेमध्ये अहोरात्र झटणारे सेलेब्रिटी, शिक्षण क्षेत्रातील शिक्षणतज्ञ आणि विचारवंत
आंतरराष्ट्रीय शाळेचे प्रणेते व राष्ट्रीय आदर्श शिक्षक आदरणीय श्री दत्तात्रय वारे गुरुजी, हिवाळी शाळेचा गुणवत्तेबाबत राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणारे आदरणीय श्री केशव गावित गुरुजी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर नामांकित प्रेरणादायी व्यक्तिमत्व उपस्थित राहणार आहे.
*महाराष्ट्रातील तमाम उपक्रमशील शिक्षकांना आवाहन करण्यात येते की आपण समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहात आपला सन्मान या ध्येय फाउंडेशनच्या व्यासपीठावर होणार आहे तरी आपला प्रस्ताव 15 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करावा अशी माहिती ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री सुदाम शेंडगे सर, ध्येय अकॅडमी व प्रकाशन च्या संस्थापिका अध्यक्ष सौ अर्चना शेंडगे मॅडम प्रसार माध्यमांना बोलत होते यावेळी राज्य प्रमुख श्री संदीप पाटील सर, सचिव सौ सोनाली गाडे मॅडम व राज्य मार्गदर्शक श्री सोमनाथ शिंदे सर व राज्य टीम उपस्थित होती.
