अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
धीरज गायधने यांना डाक्टरेट (विद्या वाचस्पती ) ची उपाधी सन्मानित.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी
पुणे : दि.२७ जुलै ला नवी दिल्ली येथील पंच तारांकित हॉटेल रेडिसन ब्लू येथे आयोजित केलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याल हिंदी विद्यापीठ तर्फे धीरज राजू गायधने यांना डाक्टरेट (विद्या वाचस्पती ) हा सन्मान देण्यात आला. हा सन्मान त्यांना अध्यात्म आणि समाज सेवा कार्या बद्दल देण्यात आला आहे. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पदमश्री डा. अरविंद कुमार , विशिष्ट अतिथी डा. स्वर्णलता पांचाळ , रितू तिवारी आणि आंतरराष्ट्रीय योग गुरु श्री हरी भाई आर्यन महाराष्ट्र राज्य संयोजक म्हणून कार्यरत असलेले डॉ शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. धीरज गायधने यांनी या सन्मानाचा श्रेय आपल्या गुरुजनांना, कुटुंबियांना आणि सहकार्यांना दिला आहे.
