अनिल रत्नपारखी यांचा सेवा गौरव समारंभ संपन्न.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू :दि. 3 ऑगस्ट रोजी सौ. सावित्रीबाई बद्रीनारायणजी
बिहाणी नूतन प्राथमिक शाळेतील कार्यरत असणारे अनिल पांडुरंगराव रत्नपारखी यांची 31 जुलै 2025 रोजी सेवानिवृत्ती झाली.. त्यानिमित्य आयोजित दि. 3 ऑगस्ट रोजी त्यांचा सेवा गौरव समारंभ संपन्न झाला. या समारंभास अध्यक्ष म्हणून मकरंदजी दिग्रसकर तर प्रमुख उपस्थिती मध्ये नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे,सचिव डॉ.व्ही. के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहानी, कार्यकारणी सदस्य दत्तरावजी पावडे,राजेशजी गुप्ता,माजी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव प्रशालेचे मुख्याध्यापक उल्हास पांडे व्यासपीठावर विराजमान होते. कार्यक्रमा दरम्यान स्वागत गीत सौ. डोळस रेखा यांनी सादर केले. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक उल्हास पांडे यांनी केले.सौ. कुंभार रामकोर, चेतन पानझाडे, सौ. देवकर, यशवंत कुलकर्णी,सतीश कुंडीकर यांनी मनोगत व्यक्त केले.. सत्कारमूर्ती अनिल पांडुरंग रत्नपारखी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कुबरे सोनाली यांनी तर आभार श्री.अर्जुन पंडित यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व सहकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
