एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी

सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन आणि बृहन महाराष्ट्र योग परिषद अमरावती यांच्या मान्यतेने योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी आणि नूतन योग सेंटर सेलू आयोजित जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी नूतन योग सेंटर सेलू येथे यशस्वी संपन्न झाली.दिनांक 30 जुलै आणि 31 जुलै रोजी या स्पर्धा पुढील वयोगटात मुला मुलींची घेण्यात आली. सब ज्युनियर गट, जुनियर गट, सीनियर गट, सीनियर ए, सीनियर बी, आणि सीनियर सी. वयोगट दहा ते 55 वर्षापर्यंत या स्पर्धा घेण्यात आल्या.उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरद कुलकर्णी अध्यक्ष योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक योगशिक्षक नागेश देशपांडे हे होते.नूतन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे, कृष्णा कवडी, गणेश माळवे, कमलाकर कदम, नागेश कान्हेकर, योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव देविदास सोन्नेकर उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमात नूतन योग सेंटरच्या चिमुकल्या योगपटूंनी शौर्य फटाले, काव्या राजवाडकर, आणि यशिका खराटे यांनी चित्त थरारक योगासन सादरीकरण केले.या स्पर्धेत परभणी गंगाखेड जिंतूर सेलू या तालुक्यातून विविध वयोगटात 90 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.समारोप समारंभात सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे तसेच सुवर्णपदक, रौप्य पदक आणि कास्यपदक खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते नागेश कान्हेकर, गणेश माळवे, डी डी सोन्नेकर, कॉम्पिटिशन मॅनेजर माधव देशपांडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
पंच म्हणून कृष्णा कवडी, लक्ष्मीकांत फटाले, सुषमा सोमानी, सुश्मिता भरदम, शिल्पा बरडे , शिल्पा पिंपळे, स्वाती देशपांडे, ऋतुजा कान्हेकर, सोमनाथ महाजन, आनंद क्षीरसागर, चेतन कुमार भागवत यांनी काम पाहिले.अंतिम निकाल पुढीलप्रमाणे सब ज्युनिअर गट सोमनाथ जाधव तथास्तु रकटे धोंडीबा कुकडे मल्हार काटे व्यंकटेश शिंदे अंश जोशी सानवी झाल्टे वेदिका कुठे आराध्या आकाशी वैष्णवी ढोले जूनियर गट शिवप्रेम काटे अमोल रेंगे उत्कर्ष सूर्यवंशी दीपक पौळ युवराज यादव सूर्याजी राणे विवेक दुधाटे सानवी घिके सृष्टी सोळंके श्रेया घिके अनुष्का शिंदे सीनियर गट दिनेश देवकते पौर्णिमा देशमुख शितल खंदारे मेघा कदम अमृता भगत पुष्पा काकडे श्रुती कुलकर्णी सीनियर ए गट चैतन्य पालवडे सीनियर बी गट रोहित खात्री विकास गवई कृष्णा पवार रामा गायकवाड चेतन कुमार भागवत शिल्पा बर्डे सुश्मिता भरदम रोहिणी शिंदे सीनियर सी गट प्रशांत घिके लक्ष्मीकांत फटाले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link