अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
स्व.दुर्गाताई या सेलूच्या श्यामच्या आई होत्या_ डॉ.कोठेकर.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
स्मृतिदिनानिमित्त दुर्गाताई यांना अभिवादन, नूतन कन्या शाळेत कार्यक्रम.
सेलू : येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेत स्व. सौ. दुर्गाताई कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त (३१ जुलै) त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य विनायकराव कोठेकर यांनी सांगितले की, सेलूसारख्या लहान शहरात साने गुरुजी कथामालेची सुरुवात दुर्गाताईंनी केली आणि ती घराघरात पोहोचवून श्यामसारखी मुले घडवण्याचे काम केले. त्यामुळे दुर्गाताई कुलकर्णी या सेलूच्या श्यामची आई आहेत.यावेळी व्यासपीठावर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य विनायकराव कोठेकर,
कार्यकारिणी सदस्य प्राचार्य शरद कुलकर्णी, प्रा. सुभाष बिराज दार, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, पर्यवेक्षक दत्तराव घोगरे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दुर्गाताई कुलकर्णी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रशालेतील हर्षदा मोगल हिने आईवर आधारित एक संस्कार कथा सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन भालचंद्र गांजापूरकर यांनी केले. याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
