अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
एरंडोल येथे महिला दक्षता समितीची बैठक संपन्न
प्रतिनिधी स्वप्नील पाटील
एरंडोल प्रतिनिधी –एरंडोल येथील पोलिस स्टेशन अंतर्गत महिला दक्षता समितीची बैठक पोलिस स्टेशनमध्ये नुकतीच संपन्न झाली. पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी समिती सदस्यांना मार्गदर्शन करून महिलांवरील अन्याय-अत्याचाराबाबत चर्चा केली. वयात आलेल्या मुलींबाबत प्रबोधन करण्याचे आवाहन केले. विशेषत: मुलीच्या आईला मार्गदर्शन करण्याची गरज असून मोबाईलचा वापर कमी करणेबाबत सुचना करण्याचे देखील आवाहन त्यांनी केले.
सदर बैठकीसाठी निवृत्त मुख्याध्यापिका उषा खैरनार, शोभा साळी, शकुंतला अहिरराव, डॉ. राखी काबरा, मंगला महाजन, वंदना पाटील, कल्पना लोहार, माजी नगरसेविका छाया दाभाडे, आरती ठाकूर आदींची उपस्थिती होती. यावेळी महिला सदस्यांनी केलेल्या सुचनांची दखल घेतली जाईल असे निलेश गायकवाड यांनी आश्वासन दिले. यशस्वीतेसाठी हे. कॉ. अनिल पाटील आणि सहकार्यांनी परिश्रम घेतले.
