फंगसयुक्त मिठाई विक्रीचा प्रकार उघड – ग्राहकानची FDA कडे केली तक्रार
नागपूर, हिंगणा – सिताबर्डी येथील प्रसिद्ध गणगौर मिठाई दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेल्या मिठाईत फंगस आढळल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हिंगणा येथील महेंद्र मनोहर भोयर यांनी दिनांक २९ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३८ वाजता, ऑनलाईन पेमेंटद्वारे ₹२६० ची मिठाई खरेदी केली होती. मात्र, घरी आल्यानंतर मिठाई उघडताच त्यात फंगसयुक्त पदार्थ आढळले.
या घटनेनंतर संबंधित ग्राहकाने दुकानदाराशी संपर्क साधला असता त्यांनी मिठाई बदलून देण्याची तयारी दर्शवली. पण ग्राहकाने याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन (FDA), नागपूर विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
भोयर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले की, “जर ती मिठाई आम्ही खाल्ली असती, तर आमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला असता.” त्यांनी अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकारामुळे नागपूरमधील मिठाई विक्रेत्यांकडून आरोग्यदायी पदार्थांची विक्री होते का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अशा प्रकारच्या घटनांवर FDA कोणती कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
