अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
हात मदतीचा विद्यार्थ्यांना प्रेम देणारा उपक्रम.मिळणाऱ्या मदतीतून विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करावे..अँड हर्षवर्धन सोनकांबळे
जिजामाता बाल विद्यामंदिर येथील ५१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू :दि.1 ऑगस्ट शुक्रवार रोजी शहरातील राजर्षी छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता बाल विद्यामंदिर आंबेडकर नगर येथील शाळेत
स्त्रीमुक्ती स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते लोक कल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालणाऱ्या
शहरातील जिजामाता बालविद्यामंदिर” हात मदतीचा” शैक्षणिक साहित्य वाटप सामाजिक उपक्रम तुमच्या आमच्या सहकार्याने या उपक्रमाचे शालेय साहित्य अँड. हर्षवर्धन सोनकांबळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे सचिव जेष्ठ पत्रकार डि.व्हि. मुळे, संचालिका डॉ अभिलाषा जोगदंड, प्रा.के.डी.वाघमारे, संयोजक सुनील गायकवाड, पि. एस. कौसडीकर, उत्तम गोपेकर, पु.ना.बारडकर, सुनील वाकडीकर, भारत डख, मनिष बोरगावकर, दामोधर दळवे शेख साजिद, वैभव खरात, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका संघटक शुकाचार्य शिंदे, सामाजिक कार्यकर्ते पि. के. शिंदे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमापूजनाने प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात झाली.
अँड.हर्षवर्धन सोनकांबळे म्हणाले की हात मदतीचा उपक्रम सेलू शहरात हा अभिनव उपक्रम असुन या उपक्रमाच्या माध्यमातुन मागील 7 वर्षापासून कित्येक गरजु विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला आहे या मिळालेल्या लाभातूनच विद्यार्थ्यांनी ध्येया पर्यंत जाण्यासाठी कसोटीने अभ्यास करावा आणि मिळणाऱ्या मदतीतून ध्येय साध्य करावे.तसेच या उपक्रमाचे संयोजक सुनील गायकवाड व सहकारी मित्रांचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमास शुभेच्छा देत पुढील कार्यक्रम याही पेक्षा मोठा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.जिजामाता बालविद्यामंदिर 51 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले.शुकाचार्य शिंदे यांनी जयंतीनिमित्त अभिवादन पर गीत सादर केले या गीतातून लोकशाहीर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्र प्रकाश टाकला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक सुनील गायकवाड, सूत्रसंचालन भगवान पावडे तर आभार मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णकांत खापरखुंटीकर,
विजयमाला काळे, विष्णु कटारे ,मंगेश शेळके,सुनील राठोड, बाळु धनवे, व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.
