अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
निपाणी टाकळी जी.प.प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि. एक ऑगस्ट रोजी सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमा साठी गावातील सरपंच सुनील सावंत उपसरपंच लहानाप्पा हरकळ आनंद प्रकाश राव मुळे तालुका उपाध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ सखाराम तुकाराम कासार पांडुरंग गवारे बाबुराव लोंढे दगडू गवारे उत्तम सावंत मोहन गवारे पवन गवारे विकास लोंढे नारायण गवारे धोंडीराम गवारे ज्ञानेश्वर गवारे भगवानराव रासवे तुकारामजी कासार उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी कल्यानी तळेकर गीता डाके व कृष्णा वाघमारे यांनी भाषणे केली यानंतर अखिल भारतीय मातंग संघ शाखा निपाणी टाकळी तालुका सेलू जिल्हा परभणी यांच्यातर्फे शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना रजिस्टर पेन व खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमा साठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भुते सर लटपटे सर डोळस मॅडम व काकणाळे मॅडम उपस्थित होते.
