अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
दिवा प्रतिष्ठानचा संकल्प वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा…!
संपादक संतोष लांडे
ए.आर.ए.आय. टेकडी, कोथरूड आपल्या कोथरूड परिसरातील ए.आर.ए.आय. टेकडी, हनुमान टेकडी येथे दिवा प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब पुणे २१ सेंच्युरी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिक, विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थित राहून वृक्षारोपण करत पर्यावरण रक्षणाचा संकल्प यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत टेकडीवर विविध फळझाडे, औषधी वनस्पती आणि इतर छायादार झाडांची लागवड करण्यात आली. तसेच वृक्ष लागवड न करता लावलेल्या प्रत्येक झाडाची जबाबदारी घेण्याचा निर्धारही सर्वांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे टेकडीची नैसर्गिक शोभा वाढेल. तसेच सिमेंट काँक्रीटच्या जंगलात हरवणाऱ्या निसर्गासाठी अशी हरित चळवळ अत्यंत गरजेची आहे. अशाच उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणपूरक कार्य पुढे नेत राहण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
#वृक्षारोपण #वृक्षसंवर्धन #पर्यावरण #Environment #कोथरूड #Kothrud
