अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
राष्ट्रिय महामार्गावर असलेल्या उड्डाण पूलावर वाढली झाडे , तर हॅमर लाईट बनले शोभेची वस्तू
प्रतिनिधी / अनिल चव्हाण.
———————————————
राष्ट्रिय महा मार्ग 61 वरील मानवत शहरातून बायपास गेलेल्या मार्गावर असलेल्या उड्डाण पूलावर झाडाने जागा मिळविली असल्याने भविष्यात पूलाला तड्डे जाण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहे. तर या महामार्गाची देखभाल करणारे अभियंता याचे दूर्लक्ष होत असल्याने या महा मार्गावर मानवत आणि मानवत रोड येथील उड्डाण पूलाची अशीच अवस्था आहे. तर महामार्गावर असलेल्या हॅमर लाईटची पण अशीच अवस्था देखभाली विणा झाली आहे. तर चक्क प्रकाश व्यवस्था बंद असल्यामूळे अपघात होण्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहे.
सखोल चौकशी करून कारभार सूधारावा अन्यथा लोकशाही मार्गांने नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरील व्यवस्थे विषयी नितिनजी गडकरी यांना निवेदन देऊन आंदोलन उभारावे लागेल अशी माहिती करणी सेनेचे युवा अध्यक्ष राम पंडीतराव दहे पाटील यांनी आमच्या बातमीदाराशी बोलतांना दिली.
