अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पत्रकारांनी आयुष्यमान भारत कार्डची माहिती तळागाळापर्यंत पोहचविणे गरजेचे
आमदार राजेश भैय्या विटेकर
प्रतिनिधी / मानवत
——————————————
प्रत्येक नागरिकांना पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत आरोग्य उपचार देणारे आयुष्यमान भारत कार्डची माहिती पत्रकारांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातुन तळागाळातील शेवटच्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन ९८ पाथरी विधान सभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष युवा आमदार राजेश भैय्या विटेकर यांनी ९८ पाथरी विधान सभा मतदार संघातील मानवत ग्रामीण रुग्णालया मध्ये आज आयुष्यमान भारत कार्ड वाटप प्रसंगी केले.
आयूष्यमान भारत कार्ड वाटप कार्यक्रम १ ऑगस्ट रोजी दुपारी १२-३० वाजता ग्रामीण रुग्णालयाच्या सभागृहामध्ये पार पडला.
आयूष्यमान भारत कार्डधारक प्रत्येक नागरिकांना ५ लाख रुपयां पर्यंतचा मोफत उपचार देणारे आयुष्यमान कार्ड वाटप कार्यक्रम मानवत ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयूष्यमान भारत कार्डचे वाटप ९८ पाथरी विधान सभा मतदार संघाचे युवा, कर्तव्य दक्षआमदार राजेश भैय्या विटेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मानवत शहराचे युवा नेते डाॅ. अंकुशरावजी लाड व मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीचे यूवा सभापती पंकज भैय्या आंबेगावकर यांची या वेळी प्रमूख उपस्थिती मध्ये पार पडला. यावेळी मानवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेख अशेक हुसेन, मानवत नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजकूमार खरात , मा.विनोदजी रहाटे, अडवोकेट किरण भैय्या बाराहाते , माजी नगर सेवक गणेश कुमावत यांच्यासह संतोषराव लाडाने मोहनराव लाड हे यावेळी उपस्थित होते. यावेळी मानवत शहरातील साधारणत गरजू २००० आयुष्यमान भारत कार्ड मानवत ग्रामीण रुग्णालयाकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्राथमिक स्वरूपात १५१ आयुष्यमान भारत कार्डचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अंकुशरावजी लाड यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुग्ण कल्याण समिती सदस्य राणा संजयसिंह नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औषध निर्माण अधिकारी श्रीमती शितल गायकवाड व यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार कपिल भरड यांनी मानले.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप अंभोरे , राष्ट्रीय बाल स्वास्थ अधिकारी डॉ. ललित कोकरे डॉ. गजदत्त चव्हाण, डॉ. प्रीती दीक्षित, डॉ. सुषमा भदर्गे , डॉ. कलीम खान, डॉ शकील खान यांच्यासह अकबर खान पठाण , शीला पाटील, शुभांगी जोशी , लक्ष्मी सोनवणे, संजय सोळंके, नरेंद्र टोणपे , राजू कच्छवे, विष्णू टेकाळे , मीनाक्षी कदम, शोभा राजपूत , रेणुका देशमुख ,निशा वाकळे, दीक्षा गायकवाड , कपिल सोनटक्के, बजरंग ढवळे ,दीपक कुमावत, शुभम करवलकर , शुभम भदर्गे , राजू पिंपळे ,राजू चिंडाले, विठ्ठल धोपटे नितीन शिंदे आदि अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला होता
