अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादक मंगेश पवार
सारोळे जि.प. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन उत्साहात संपन्न
दि. 2 सारोळे :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यासाठी आज पालक सभा आयोजित करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी समिती अध्यक्ष मा. महेंद्र मोरे होते.
सभेच्या प्रारंभी शाळेच्या जेष्ठ शिक्षिका छाया हिंगे यांनी उपस्थित पालकांचे स्वागत केले, तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत जगताप यांनी केले. व्यवस्थापन समिती सदस्यांची निवड व त्याचा आराखडा केंद्रप्रमुख विजयकुमार थोपटे यांनी उपस्थितांसमोर मांडला. शासन निर्णयानुसार आणि संवर्ग निहाय नियमांचे पालन करत आजच्या सभेत शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यात आली.
या बैठकीत विजय शंकर धाडवे यांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून तर कोमल संजय पांगारे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. तर पुढच्या वर्षी दिगंबर मळेकर यांना उपाध्यक्ष करण्यासाठी सर्वांमध्ये निर्णय घेण्यात आला.सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन शिक्षक संदीप सावंत यांनी केले.
सभेला ग्रामपंचायत सारोळेचे उपसरपंच झुंजार दादा धाडवे, “पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज” चे संपादक पत्रकार मंगेश पवार, पालक जयदीप साळुंके, सुनिल धाडवे, राजेंद्र साळेकर,नवनाथ शिंदे, दिगंबर मळेकर, माजी उपसरपंच रोहिदास महांगरे, मा.शाळा व्यवस्थापन अध्यक्ष योगेश धाडवे, पालक महिला तसेच शिक्षक जया कांचन, जयश्री शिर्के, कांचन थोपटे, वंदना कोरडे, अर्चना वानखडे, महेशकुमार घाडगे आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
बिनविरोध निवड होण्यासाठी पत्रकार मंगेश पवार, मा. उपसरपंच रोहिदास महांगरे तसेच दिगंबर मळेकर यांनी प्रयत्न केले.विजय शंकर धाडवे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी एकमुखाने निवड झाली असून, त्यांच्या नावावर पालकांनी आणि ग्रामस्थांनी विश्वास दाखवला आहे.
शाळेसाठी नियोजित कार्य व उद्दिष्टे:
विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण व डिजिटल सुविधा वाढवणे शिक्षक-पालक संवाद अधिक प्रभावी करणे,शाळेचा सर्वांगीण शैक्षणिक व भौतिक विकास,विद्यार्थ्यांसाठी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे,स्वच्छ, सुरक्षित व आधुनिक शाळा परिसर उभारणार
विजय धाडवे, शाळा समिती व्यवस्थापन अध्यक्ष
उपसरपंच झुंजार दादा धाडवे यांनी पालक सभेमध्ये स्पष्ट सांगितले की,
“ग्रामपंचायत सारोळेच्या वतीने जिल्हा परिषद शाळेसाठी आवश्यक ती प्रत्येक मदत केली जाईल.”त्यांनी शाळेच्या भौतिक विकास, स्वच्छता, पाणी, वीज, संरक्षक भिंत, मैदानाचा विकास यांसारख्या बाबतीत ग्रामपंचायतीकडून सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले.त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक आणि ग्रामपंचायत यांच्यात सुसंवाद राखून काम करण्यावर भर दिला.
झुंजार दादा धाडवे हे ग्रामपंचायत पातळीवर शैक्षणिक विकासाचे सक्रिय समर्थक असून, शाळेला PM SHRI योजनेतील निधीचा योग्य वापर होण्यासाठी ग्रामस्तरावर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
“गाव आणि शाळा एकत्र आल्यासच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकते, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” —उपसरपंच झुंजार दादा धाडवे
“शाळा विकासासाठी एकत्र येऊया – राजकारणाला शाळेबाहेर ठेवूया!”
मा. अध्यक्ष योगेश धाडवे यांचे स्पष्ट मत
> “शाळेमध्ये कोणतेही राजकारण केलं जाणार नाही.
शाळा व्यवस्थापन समिती ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे.
प्रत्येक निर्णय हा पालक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य आणि समिती सदस्यांच्या सहकार्याने, पारदर्शकपणे आणि नियोजनबद्ध घेतला जाईल.”
शिक्षण ही राजकारणाची जागा नाही, तर सर्वांची जबाबदारी आहे, हे त्यांनी ठामपणे नमूद केले.
“आपण सर्वजण एकत्र आलो, तरच शाळेचा खरा विकास होईल. माझा प्रामाणिक प्रयत्न राहील की विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कोणतीही राजकीय अडचण होऊ देणार नाही.”
योगेश धाडवे मा.अध्यक्ष शाळा समिती व्यवस्थापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे ही PM SHRI (प्रधानमंत्री स्कूल फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट) योजनेत समाविष्ट झाली आहे.या निधीतून स्मार्ट क्लासरूम, सोलर सिस्टम, संगणक प्रयोगशाळा, वाचनालय, विज्ञान लॅब, स्वच्छतागृहे, सुरक्षित पाणी व्यवस्था, मैदानाचे सुशोभीकरण आदी सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.
