अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
दुचाकी चोरणाऱ्या आरोपींच्या मुद्देमालासह तळेगांव एम.आय.डी.सी पोलिसांनी आवळल्या मुसक्या :- सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत..!!
कलावती गवळी (पिंपरी चिंचवड ) प्रतिनिधी
तळेगांव एम. आय. डी.सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटरसायकली प्रकरणात तळेगांव एम. आय डी.सी पोलीस आणि तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये जवळपास सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विनोद मेघावत (वय 24) रा. पाषाण पुणे,) यांची दुचाकी (क्रमांक 67 11) ही 19 जुलै रोजी बदलवाडी येथील मार्केट कॉट कंपनी समोरुन चोरीस गेली होती. या प्रकरणी तळेगांव एम आय डी.सी. पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर 154/2025 नोंदवण्यात आला होता. गोपनीय माहिंतीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण सी.सी.टीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 30 जुलै रोजी महाळुंगे (ता. खेड )येथील छापा टाकून तिघां आरोपींना ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली असता त्यांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे.सोहेल नवाज खान (वय 20) रा. द्वारका सिटी महाळुंगे) संतोष अशोक आहिवळे ( वय 19 ) सुमित संतोष शिंगारे (वय 19) दोघेही रा. राजू घाटे रूम महाळुगे ) अशी नावे आहेत. मुळगांवे गुलबार्ग (कर्नाटक) सोलापूर लातूर जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याकडून एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी विनायक विनायककुमार चोंबे उप आयुक्त विशाल गायकवाड सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कोपनर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक गोलाकार पो.हे.ए.डी. रावण पो.ना. ज्ञानेश्वर सातकर पो.कॉ. स्वराज साठे रमेश घुले विनायक शेरमाळे भीमराव खिलारे यांच्या पथकांने ही कामगिरी केली आहे. तळेगांव एम.आय.डी.सी. पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तिन्ही दुचाकी हस्तगत करून पोलिसांनी शंभर टक्के मालमत्ता परत मिळवले आहे. पोलिसांच्या कौतुस्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे.
