अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू
अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ सामूहिक रजा आंदोलन यशस्वी
दिनांक १ ऑगस्ट २०२५
गेल्या काही दिवसांत राज्यातील नागपूर येथील कथित शालार्थ घोटाळा प्रकरणी राज्यातील काही अधिकाऱ्यांना पोलीस यंत्रणेकडून विनाकारण अटक सत्र सुरू आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील अखिल महाराष्ट्र शिक्षण राजपत्रित अधिकारी संघाचे सामूहिक रजा आंदोलन दिनांक एक ऑगस्ट 2025 रोजी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय समोर मुख्य आंदोलन आयोजित करण्यात आले होते त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करणारे याबाबत निवेदन देऊन आपली व्यथा संघटनेमार्फत मांडण्यात आली आहे तसेच आज दिनांक एक ऑगस्ट 2025 रोजी मुख्य आंदोलन स्थळी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे समवेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून अधिकाऱ्यांवर पोलीस यंत्रणात होणाऱ्या अन्यायकारक अटके विरोधात आजचे आंदोलन असून पुढील काळात कोणाही अधिकाऱ्याला विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय अटक करण्यात येऊ नये अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर अशा प्रकारे लेखी हमीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नाही तर दिनांक 8 ऑगस्ट 2025 पासून राज्यातील सर्व अधिकारी हे बेमुदत सामूहिक रजा आंदोलन सुरू करणार आहेत.
या आंदोलनाला राज्यातील शिक्षणसेवेतील सर्व अधिकारी सहभागी झाले होते. सुमारे 200- अधिकारी आयुक्त कार्यालयात उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ,अराजपत्रित अधिकारी संघ,शिक्षण सक्षमीकरण अधिकारीसंघटना
त्याचबरोबर विस्तार अधिकारी संघटना व मुख्याध्यापक महासंघ
मुख्याध्यापक महामंडळ अराजपत्रित अधिकारी संघटना
कर्मचारी संघटना
शिक्षक समिती, शिक्षक संघ शिवाजीराव गट यांनी ही पाठिंबा
या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविण्यात आलेला आहे
राज्यात बोगस शालार्थ आयडी प्रकरणी शिक्षण विभागाची चौकशी समिती घटित करण्यात आलेली होती या चौकशी समितीने दिलेला अहवालावर विभागाने व शासनाने निर्णय घ्यावा व त्यानुसार दोषींवर कारवाई करावी .ज्यांचा कोणताही सहभाग संबंधित गुन्ह्यामध्ये नाही अशा अधिकाऱ्यांना याप्रकरणी विनापरवानगी अटक करण्यात येत आहे
त्यामुळे विभागाने अधिकाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेतल्याशिवाय कोणत्याही वेतन देयकांवर स्वाक्षरी करणार नाही तसेच अतिरिक्त कामाचा ताण ,सुट्टीच्या दिवशी कालावधीतील काम यावर बहिष्कार टाकण्यात येईल व येत्या 8 ऑगस्ट पासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल असा निर्धार राजपत्रित शिक्षण सेवा अधिकारी संघाने केला आहे
या आंदोलनामध्ये प्रत्येक जिल्हास्तरावर त्या त्या जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी कर्मचारी विस्तार अधिकारी संघटना मुख्याध्यापक संघटना सहभागी झाल्या होत्या अशी माहिती संघटनेचे पदाधिकारी यांनी दिली
