अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना महावितरणचे अभिवादन
नागपूर, दि. 1 ऑगस्ट 2025: दलित साहित्याचे जनक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी, थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महावितरणने त्यांना अभिवादन केले.
महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन कार्यालयात नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, सहायक महाव्यवस्थापक महेश जाधव, कार्यकारी अभियंता विजय तिवारी, प्रणाली विश्लेषक प्रवीण काटोले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही अण्णाभाऊंना अभिवादन केले.
फ़ोटो ओळ – अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना महावितरणचे अधिकारी व कर्मचारी.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
