अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने मेट्रो स्थानकाला आंदोलन करण्यात आले
प्रतिनिधी मुकूंद मोरे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मेट्रो स्थानला ‘कोटक’ छत्रपती शिवाजी महाराज स्थानक असे नामकरण करणाऱ्या महायुती सरकारविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. ह्या आंदोलनात विभागप्रमुख संतोष शिंदे, विभागसंघटक युगंधरा साळेकर, विधानसभाप्रमुख विकास मयेकर, राजू फोडकर, महिला विधानसभा प्रमुख गायत्री आवळेगावकर तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
