महसूल अधिकारी मिलिंद कुरकुरे यांचा मंत्री महोदय,आमदार, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव.
यावल दि.१ ( सुरेश पाटील )
आज दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी गुणगौरव समारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे मिलिंद वासुदेव कुरकुरे ग्राम महसूल अधिकारी दहिगाव तहसील कार्यालय यावल यांना यावल रावेर तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय फैजपूर यांच्या मधून चांगले उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन मा.नामदार संजय भाऊ सावकारे,
मा.आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
