अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
हिप्परगा थडी शाळेत अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी.
मारोती एडकेवार जिल्हा /प्रतिनिधी नांदेड
नांदेड : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, हिप्परगा थडी तालुका बिलोली येथे. दिनांक १ ऑगस्ट रोजी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, यांची पुण्यतिथी व,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही थोर,विभूतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यानंतर,विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित चरित्र पर भाषणे, प्रभावीपणे सादर केली यावेळी, विद्यार्थिनी कु. कीर्ती धसाडे यांनी, आपले मनोगत अत्यंत प्रभावी शैलीत मांडले. सर्व शिक्षक, व पर्यावरण प्रेमी शिक्षक बालाजी गेंदेवाड सर यांनी, आपल्या भाषणातून या दोन्ही थोर व्यक्ती महत्त्वाचे कार्य विचार आणि त्यांचे समाजहितासाठीचे योगदान यावर, प्रेरणादायी मार्गदर्शन केले.टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला राजकीय दिशा दिली तर, अण्णाभाऊंनी समाजाच्या वंचित घटकांना लेखणी आणि शायरीच्या माध्यमातून हक्क मिळवून दिला. असे मत त्यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाचे संयोजन शाळेतील शिक्षक वर्गाने उत्तम प्रकारे पार पाडले, विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती, समता,आणि सामाजिक, बांधिलकीची शिकवण मिळाल्याने, हा कार्यक्रम विशेष उल्लेखनीय ठरला,
-इतिहास घडवणाऱ्यांना विसरू नका, कारण तेच आपल्या भविष्य घडवायला शिकवतात ( शिक्षणप्रेमी शिक्षक बालाजी गेंदेवाड सर ).
