अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी – लोकहितवादी सेवा संघाच्यावतीने अभिवादन कार्यक्रम
प्रतिनिधी त्र्यंबक भालेराव
पिंपरी – लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने आज दिनांक १ ऑगस्ट रोजी महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ताशा पथक वाजवत आणि घोषणांनी परिसर दणाणून टाकत, लोकशाहीरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष धर्मराज बनसोडे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे शोषित, वंचित व मेहनतकऱ्यांच्या जीवनावर आधारित साहित्य आणि देशहितासाठी केलेल्या कार्यावर सखोल भाषण केले. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
या अभिवादन कार्यक्रमाला विशाल वाघमारे, धर्मराज बनसोडे, समद शेख, अतिश दुधावडे, रोहित चंदणे, विकास वाघमारे, आशा वायडंडे, निगम राय, जयंश्री वडले, दत्तात्रय व्हनकडे, राजेश दास यांसारखे अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडले. संपूर्ण परिसरात सामाजिक सलोखा, प्रेरणा व एकतेचे वातावरण पाहायला मिळाले.
