युवासेना – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
प्राचीन अंबरनाथ शिवमंदिरात भक्तांची वाढती गर्दी युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानी सुविधांसाठी केली निर्णायक मागणी
प्रतिनिधी मुकुंद मोरे अंबरनाथ
अंबरनाथ, दिनांक : ३१/०७/२५
अंबरनाथ मधील प्राचीन शिवमंदिरात दर्शनार्थ उभ्या असलेल्या भाविकांसाठी तात्पुरती पंडाल व बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याची मागणी अंबरनाथ नगरपालिका उप मुख्यअधिकारी यांच्याकडे राज प्रकाश महाडिक अंबरनाथ विधानसभा अधिकारी युवासेना यांनी केली.
११ व्या शतकातील ऐतिहासिक श्री अंबरनाथ शिवमंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून अलीकडील सौंदर्यीकरण प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय शिवमंदिर कला महोत्सवामुळे येथील भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवारी श्रावण सोमवार येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते ज्यामुळे भाविकांना रांगेत तासन्तास उभे राहावे लागते
वर्तमान समस्यांवर युवासेनेचा भर
भाविक मंदिराच्या प्रवेशद्वारापासून कैलाश कॉलनीपर्यंत लांब रांगेत उभे रहावे लागते
पावसाळ्यात पंडाल नसल्यामुळे भाविकांना पाऊसाचा सामना करावा लागतो
रस्त्यावरील वाहतूक धोका आणि अव्यवस्थित रांगेमुळे सुरक्षा समस्या निर्माण होत आहेत
युवा सेनेच्या मागण्या
१) मंदिराच्या प्रवेशद्वारापासून कैलाश कॉलनी पर्यंत पंडाल व्यवस्था आणि लाकडी लोखंडी बॅरिकेड्सची व्यवस्था जेणेकरून पाऊस पासून संरक्षण व गर्दीवर नियंत्रण करता येईल
२) पाण्याची सोय व प्राथमिक आरोग्य सेवा फर्स्ट एड बूथ
राज महाडिक अंबरनाथ विधानसभा अधिकारी यांनी नमूद केले की हा प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिराच्या तर्जेत जागतिक पातळीवर विकसित करण्यात येत आहे भाविकांच्या सोयी व सुरक्षिततेसाठी नगरपालिकेने तातडीने हे उपाय राबवले पाहिजेत त्यांनी श्रावण महिन्याच्या उर्वरित तीन सोमवारी लगेच कार्यवाही करण्याची आवश्यकता भार देत हजारो भाविकांच्या हिताचा विचार केला आहे
युवासेना – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची या मागणीमुळे नागरी सुविधा व भाविकांच्या सुरक्षिततेला अंबरनाथ नगरपालिकेकडून प्राधान्य दिले जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
उपस्थित पदाधिकारी
राज प्रकाश महाडिक
( अंबरनाथ विधानसभा अधिकारी युवासेना )
महेश दुरगुडे
( शहर समन्वयक अधिकारी युवासेना )
गणेश घोणे
( उपशहर प्रमुख अध्यक्ष शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष )
अमर परदेशी
(उपशहर संघटक शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष )
अनंत गायकवाड
( शाखाप्रमुख शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष )
सुमित घोणे
( युवासेनिक
नकवल दादा,
( ज्येष्ठ शिवसैनिक)
