शिवसेनेने करून दाखवले
शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरे ह्यांचे अभिनंदन
प्रतिनिधी :- दौलत सरवणकर
ठिकाण :- वरळी (बी.डी.डी)
शिवसेनेने करून दाखवले !
आदित्यजी ठाकरे ह्यांचे अभिनंदन !
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांचे स्वप्न होतं की मुंबईतील मराठी माणूस हा मुंबईतच राहिला पाहिजे. आदित्यजींनी ते आज पूर्ण केले आणि बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला उच्चब्रू टॉवर मध्ये घर मिळवून दिले.
बीडीडी चाळीमध्ये १६० चौ.फू च्या घरातील मराठी माणसे गेली अनेक दशके पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत होती. २०१९ साली वरळी मधून आदित्यजी आमदार झाले आणि उद्धवसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पहिल्याच टर्म मध्ये आदित्यजींनी तब्बल ११,५०० कोटी निधी मतदारसंघात आणून बीडीडी च्या पुनर्वसनाचा विषय मार्गी लावला. टाटा सारखे चांगले कंत्राटदार नेमून २०२१ साली काम सुरु झाले आणि आज इकडच्या पहिल्या टप्प्यातील रहिवास्यांना ५०० चौ.फू ची घरे मिळत आहेत आणि पुढची १२ वर्षे मेन्टेनन्स देखील भरावा लागणार नाही. ह्या सगळ्या करता रहिवास्यांना एक रुपयाही मोजावा लागला नाही.
सरकार ने केलेली गुंतवणूक ‘सेल’ इमारतीतून विक्री करून वसूल केली जाईल.
अनेकदा विरोधक विचारतात की उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्री असताना मुंबईतला मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे म्हणून काय केले?
ह्याचे उत्तर बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प आहे तो त्यांनी जाऊन पाहावा.
