जालना जिल्हाधिकारी कार्यालयात महिलाराज डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची बदली, तर आशिमा मित्तल जालन्याच्या नव्या जिल्हाधिकारी…!!
अनुजा कारखेले (जालना जिल्हा) प्रतिनिधी
राज्य शासनांने बुधवारी सायंकाळी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असुन. यामध्ये जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचाही समावेश होता. त्यांची बदली ठाणे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर नाशिक येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आशिमा मित्तल यांनी नाशिक येथे सीईओ म्हणून काम करताना विविध उपक्रम राबविले असून शिक्षण विभागातही त्यांचे उपक्रम राज्यभर चांगलेच चर्चेत होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे कामकाज सुधारण्यासाठी मित्तल यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांच्या कार्यकाळात सुपर 50 यासारख्या उपक्रमांनी राज्यभर ओळख निर्माण झाली होती. नाशिक जिल्ह्यात दोन वर्ष दहा महिने प्रशासक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या जागी मात्र अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. तर जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी 2023 मध्ये जालना जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. गत दोन व अडीच वर्षात त्यांनी रेशीम शेती वाढीसाठी विशेष प्रयत्न केले होते. त्याशिवाय बालविवाह मुक्त अशी सस्ती अदालत यासारखे उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत नदी पात्राची स्वच्छता मोहीम व इतर उपक्रम मातही जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ सहभाग ठरला राहिला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने बुधवारी डॉ. पांचाळ यांची ठाणे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी पदाचा पदभार तात्काळ स्वीकारला आहे. तर जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जालना जिल्हाधिकारी म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आता महिलाराज यांची नियुक्ती झाल्याची जालना करांना दिसून आली. सर्वसामान्यांना प्रथम न्याय देणाऱ्या जिल्हाधिकारी कर्तव्यदक्ष,शिस्तप्रिय (आयएएस अधिकारी) म्हणून त्यांना ओळखले जाते.
