जळगाव जिल्ह्यातील वावडदा,म्हसावद परिसरात सट्टा मटकाच्या पिढ्या जोरदार सुरु असल्याची जनतेमध्ये जोरदार चर्चा जिल्हा पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची अत्यंत गरज..
(जळगाव जिल्हा क्राईम रिपोर्टर भुषण भालेराव )
जळगाव जिल्ह्यातील वावडदा, म्हसवद येथे सट्टा पिढी जोमात आणि जनता कर्जबाजारीपणा मुळे कोमात.गेल्याचे चित्र सध्या समोर आले आहे या परिसरात असलेली पोलिस चौकी देखील बंद अवस्थेत आढळून आल्याचे दिसले याप्रकाराकडे जिल्हा पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य पाऊल उचलून अनेक संसार उद्धवस्त होण्यापासून वाचवावे अशी परिसरातील जनतेची मागणी तसेच जळगाव जिल्ह्यातील वावडदा, म्हसावद येथे सट्टा पिढी व्यवसाय हा बिन्धास्त पणे सुरु आहे. यापूर्वीही या बाबतीत मीडीया पोलीस टाइम ने हे वृत्त प्रसारित केले होते मात्र तरीही पोलिस प्रशासनाला जाग आली नाही असे चित्र दिसते याकडे जाणीव पूर्वक पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे की काय ? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे आणि चर्चा देखील जनतेकडून सुरु असल्याचे चित्र दिसत असुन जनतेकडुन ऐकण्यास मिळत आहे या व्यसनामुळे तरुण व वयस्कर लोक हे कमी वेळेत जास्त पैसे कमविण्याच्या आमिषा पोटी अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गांवर आहे तरी पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी. जेणे करून अनेकांचे संसार हे उध्वस्त होण्यापासून वाचतील.अशी परिसरातील जनतेची मागणी आहे..तरी जिल्हा पोलिस प्रशासनाने या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सट्टा मटका पिढ्या कायमस्वरूपी बंद कराव्यात अशी परिसरातील वरिष्ठ नागरिकांसह परिसरातील जनतेची जिल्हा पोलिस प्रशासनाकडे रास्त स्वरुपाची मागणी आहे
