मंठा: नवीन वीज मीटर मुळे सामान्यांच्या खिशाला भुरदंड दोन पत्राच्या घरामध्ये राहणाऱ्यांना १० ते १५ हजार रुपये विजबिल
उदयसिंह बोराडे थेट वीजवितरण कार्यालयात; सर्वसामान्यांच्या व्यथांना दिला आवाज
प्रतिनिधी नामदेव मंडपे मंठा जालना
मंठा/ता ३० – मंठा शहरातील नागरिकांना वीज महावितरण कंपनीने बसवलेल्या नव्या मीटरमुळे प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. दोन पत्रांच्या घरांमध्ये राहणाऱ्या सामान्य कुटुंबांना महिन्याला तब्बल १५ ते २० हजार रुपयांचे बिल येत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारींचा भडिमार केला. नागरिकांच्या या व्यथांना तात्काळ प्रतिसाद देत बोराडे यांनी संबंधित वीजवितरण अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि वीजबिलांच्या अन्यायकारक आकारणीबाबत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, “सामान्य माणसाच्या खिशावर डल्ला मारणं खपवून घेतलं जाणार नाही!” तसेच तात्काळ या तक्रारींचे निराकरण करावं, अन्यथा आंदोलनाच्या इशाराही त्यांनी दिला.
या भेटीदरम्यान अनेक वीज ग्राहक देखील उपस्थित होते. त्यांनी थेट बोराडे यांच्या उपस्थितीत आपापल्या अडचणी सांगितल्या. काही जणांनी आधीच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट आलेल्या बिलांचे उदाहरण देत आपल्या समस्या मांडल्या.शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असून, वीज महावितरणच्या मनमानी कारभाराला लगाम बसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी उपतालुकाप्रमुख रामराव वरकड,उपशहर प्रमुख दत्तात्रय बोराडे, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब देशमुख , गोस भाई, इस्माईल भाई, व मंठा शहरातील मुस्लिम बांधव
