प्रतिनिधी – किशोर रमाकांत गुडेकर, मुंबई विभाग प्रतिनिधी प्रमुख
मुंबई सेंट्रल टर्मिनसला ‘नाना शंकरशेठ’ नाव देण्याची मागणी तीव्र ३१ जुलै रोजी होणार महत्त्वाची घोषणा?
मुंबई | ३० जुलै २०२५
महान समाजसुधारक आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या पुण्यतिथीनिमित्त, मुंबई सेंट्रल टर्मिनसला त्यांच्या नावाने नामांतर करण्याची मागणी पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. ३१ जुलै रोजी या संदर्भात केंद्र सरकार, राज्य सरकार, आणि रेल्वे मंत्रालयाकडून महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे.
या मागणीसाठी अखिल भारतीय दैवज्ञ समाजहित परिषद तसेच नाना शंकरशेठ नामकरण संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. यामध्ये अनेक मान्यवरांनी आपला पाठिंबा दर्शवला असून, पोस्टरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व इतर नेत्यांचे आभार मानण्यात आले आहेत.
नाना शंकरशेठ प्रतिष्ठानचे वतीने लावण्यात आलेल्या पोस्टरवर “नानांच्या पुण्यतिथी निमित्त मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण ‘नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस’ म्हणून जाहीर होणार का?” असा सवाल करत जनतेमध्ये उत्सुकता निर्माण करण्यात आली आहे.
