अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज ( साहेब ) सातारकरांसाठी नेहमीच प्रयत्नशील
कलावती गवळी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील बेधडक नेतृत्व आणि व्यासपीठावर खंबीरपणे वक्तृत्व करणारे आपल्या आगळ्यावेगळ्या स्टाईलच्या माध्यमांतून तसेच सर्व सामान्यांच्या आणि गोर गरिबांच्या न्यायासाठी त्यांच्या मदतीसाठी अहोरात्र तमाम सातारकरांच्या सेवेत असणारे आणि राजकीय क्षेत्रात कर्दनकाळ आणि लोकप्रिय नेता म्हणून ओळखले जाणाऱ्या सातारच्या खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले महाराज साहेबांना ओळखले जाते. सातारा जिल्ह्यातील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा (राजकीय प्रवास हा नगरसेवक पदापासून सुरू झालेला हा राजकीय प्रवास, दिल्लीतील संसदेपर्यंत जावुन पोहोचला ) छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले हे साताऱ्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यांत लोकप्रिय नेते म्हणून त्यांना चांगलेच ओळखले जाते. राजकीय क्षेत्रामध्ये दबंग आणि बेधडक,बिनधास्त वक्तृत्वासाठी देखील त्यांची ओळख महत्त्वपूर्ण मानली जाते. सर्वसामान्य लिलया मिसळण्याची त्यांना आपलंसं करण्याची हतोटी अनेकांना भावते. भावनिक स्वभावामुळे ती लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. तसेच कॉलर उडविण्याचा त्यांचा स्टाईलवर तरुणाई नेहमीच फिदा असते. सर्वसामान्यांना ते आपलेसं वाटतात हीच त्यांची मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे लोकांमध्ये एकदम लोकप्रिय उदयनराजे हे जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत. लोकांमध्येही लोकप्रिय आहेत लोक त्यांना राजे या नावाने हाक मारतात, महाराज साहेब हे सातारकरांच्या सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या नेहमीच सेवेत असताना चांगलेच पाहायला मिळतेय, ( त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवकांपासून सुरुवात झाली ) राजेशाही कुटुंबातील असले, तरी त्यांची राजकीय कारकीर्द ही नगरसेवकांपासून सुरू झाल्यानंतर एक एक पायरी चढत त्यांनी मोठा पल्ला गाठला. गोपीनाथ मुंडे यांच्या काळात ते भाजपमध्ये आले पण पुढे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सन 2009- 2019 या कालावधीत त्यांनी दिल्लीत या मतदारसंघाचे नेतृत्व केले 2019 मध्ये लोकसभेचा निकाल लागला. त्यांनी दोन महिन्यांतच खासदारकीचा राजीनामा दिला होता. भाजपमध्ये प्रवेश केला पोट निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आता 2024 मधील लोकसभेत उदयनराजे भोसले यांनी सातारचा गड पुन्हा जिंकला महाराज साहेब हे जवळपास 32,771 भरघोस मतांनी विजयी झाले होते. त्यांनी शरद पवार गटांचे शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. ( उदयनराजेंचे कुटुंब ) 24 फेब्रुवारी 1966) रोजी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा जन्म झाला ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आहेत. त्यांच्या पत्नी सौ. दमयंती राजे तर मुलीचे नाव नयनतारा तर मुलाचे नाव वीरप्रताप सिंह असे आहे.
