अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिला सज्ज दम, यापुढे खपवून घेणार नाही थेट कारवाई, बेछूट विधानांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होईल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कलावती गवळी ( मुंबई ) प्रतिनिधी
काही मंत्र्यांचे बेशिस्त वर्तन आणि बेछूट विधाने यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. आता झाले ते खूप झाले, यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. खुलासाही न घेता कठोरात कठोर कारवाई केली जाईल,असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्याच मंत्र्यांना दिला आहे. यापुढे बेताल वागले, बोलले तर थेट कारवाई करू असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तृत्वामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तर टीका होतच आहे. पण सरकारची ही बदनामी होत आहे. या मंत्र्यांचा आता राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढत आहे. विरोधक तर त्यासाठी आक्रमक झालेले दिसतात. जनतेतही त्यांनी केलेल्या वक्तृत्वामुळे नाराजी आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चांगलीच कोंडी झाली आहे. अशा स्थितीत आता आपल्या वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच सज्ज दम दिला आहे. यापुढे अशी काही विधाने कराल तर खपवून घेतली जाणार नाहीत थेट कारवाई करू असा सज्ज दम आपल्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि भरत गोगावले हे मंत्री आपल्या वक्तृत्वामुळे चांगलेच वादात सापडले आहेत. त्यांची वक्तृत्वे ही वादग्रस्त ठरत आहे. शिवाय ती सरकारसाठी अडचणीची ठरत आहे. अशावेळी त्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव येत आहे. त्यात ते मंत्री शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे फडणवीसांना त्यांच्यावर थेट कारवाई करण्यासही मर्यादा येत असल्याचे बोलले जात आहे. अशा वेळी फडणवीसांनी मात्र या मंत्र्यांचा आता समाचार घेतल्याचं समजत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना चांगलेच झापले आहे. या सर्व मंत्र्यांची त्यांनी कानउघडणी चांगलीच केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना सज्ज दम देखील दिला आहे. वादग्रस्त वक्तृत्व कराल तर खपवून घेतले जाणार नाही थेट कारवाई करणार कारण तुमच्यामुळे सरकारची ही बदनामी होत आहे. त्यामुळे कोणीही सरकारची प्रतिमा मलिन होईल असे काही वक्तृत्वे व विधाने करू नयेत असेही स्पष्ट सांगितले आहे.
