अपहरण केलेल्या २ वर्षाच्या मुलीची धाराशीव जिल्हयातुन सुखरुप सुटका, भिक मागण्यासाठी अपहरण केलेल्या टोळीचा पर्दाफाश..
पुणे (कांता राठोड)
दिनांक २५/०७/२०२५ रोजी रात्री ०९.०० वा तेदिनांक २६/०७/२०२५ रोजी रात्री ०१.३० वा चेदरम्यान वंडर सिटीझोपडपट्टी, पाण्याचे टाकीजवळ, कात्रज, पुणे या ठिकाणाहून फिर्यादी नामे धनसिंग हनुमंत काळे, वय २५ वर्षे, धंदा मजुरी, रा. वंडरसिटी झोपडपट्टी, पाण्याचे टाकीजवळ, कात्रज, पुणे यांची पिडीत मुलगी वय २ वर्षे हिस कोणीतरी झोपेतुन उचलुन पळवून नेले म्हणून दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिनंबर ३५३/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम १३७ (२) अन्वयेदिनांक २६/०७/२०२५ रोजी ०७.५४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे तसेच पिडीत मुलगी ही २ वर्षाची असल्यामुळे मा. अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी पिडीत मुलीचा तात्काळ शोध घेणेबाबत सर्व अधिकारी यांनासुचनादिलेल्या होत्या. त्याप्रमाणेभारतीविद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीसनिरीक्षक राहुल खिलारे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांची दोन टिम तयार केल्या. तसेच गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांची पथके, बाहेरील पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांची तपास पथके तयार करुन गुन्हयाचे घटनास्थळापासून सी सी टी व्ही फुटेत तपासणी करण्यास सुरवात झाली. कात्रजते पुणे स्टेशन दरम्यानचे रोडवरील आस्थापनांचे एकुण १४० सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. त्यामध्ये दोन पुरुष व एक महीला हे एका दुचाकी गाडीवरुन पिडीत मुलीस पुणे रेल्वे स्टेशन मध्ये घेवुन जाताना दिसुन आले. पुणे रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरांची पाहणी करता त्याठिकाणी पिडीत मुलीस पळवून आणणारे तीन इसमांचे सोबत आणखीन दोन आरोपी असल्याचे दिसुन आले. त्याठिकाणावरुन आरोपींची चेहरे स्पष्ट करुन त्या आरोपींची गोपनिय माहीती घेतली असता आरोपी हे तुळजापुर, जि. धाराशीव या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहीती भारती विद्यापीठ तपास पथक व गुन्हे शाखा, युनिट ०२, पुणे यांना मिळाली.
प्राप्त असलेली खात्रीशीर माहीती वरिष्ठ अधिकारी यांना दिल्यानंतर मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन तपास पथकाचे अधिकारी पोउपनि मोकाशी व अंमलदार तसेच गुन्हे शाखा युनिट ०२ चे सपोनि आशिष कवठेकर व अंमलदार अशी दोन पथके तुळजापुर, जि. धाराशीव या ठिकाणी जावुन पिडीत मुलीचा व आरोपींचा शोध घेवु लागले. स्थानिक धाराशिव एल सी बी पोलीसांचे मदतीने भारती विद्यापीठ व गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी मेहतीने व कौशल्यपूर्ण पध्दतीने आरोपींचा ठावठिकाणा शोधुन खालील ०३ आरोपी ताब्यातघेतले.
१. सुनिल सिताराम भोसले, वय ५१ वर्षे, धंदा मजुरी, रा. मोतीझारा, तुळजापुर, धाराशीव
२. शंकर उजन्या पवार, वय ५० वर्षे, रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापुर, धाराशीव
३. शालुबाई प्रकाश काळे, वय ४५ वर्षे, रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापुर, धाराशीव
नमुद आरोपींकडे तपास करता त्यांचेकडे दाखल गुन्ह्यातील पिडीत ०२ वर्षांची मुलगी सुखरुप मिळुन आली. त्यांनतर त्यांचे गुन्ह्यातील इतर ०२ साथीदार याबाबत तपास करता मिळालेल्या माहीतीवरुन खालील ०२ आरोपी देखील ताब्यात घेतले.
४. गणेश बाबु पवार, वय ३५ वर्षे, रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापुर, धाराशीव
५. मंगल हरफुल काळे, वय १९ वर्षे, रा. रेंज हिल, खडकी रेल्वे लाईनझोपडपट्टी, खडकी पुणे
नमुद आरोपींना आज दिनांक २९/०७/२०२५ रोजी सकाळी अटक केली असुन झाले तपासामध्ये आरोपींनी पिडीत मुलीस भिक मागण्याकरता तिचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याप्रमाणे दाखल गुन्ह्यात ची एन एस कलम १३९, ३(५) ची कलम वाढ करुन आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता दिनांक ०२/०८/२०२५ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे. दाखल गुन्हयाचा सपोनि स्वप्निल पाटील हे अधिक तपास करीत आहोत.
सदरची कामगिरी मा. अमितेशकुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. पंकज देशमुख साो, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. निखील पिंगळे साो, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा. मिलींद मोहीते, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर मा. राजेंद्र मुळीक, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे २, पुणे शहर मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, गुन्हे शाखा युनिट ०१ पुणेकडील
पोलीस निरीक्षक, कुमार घाटगे, तसेच गुन्हे शाखा युनिट ०२ पुणेकडील पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोउपनि वैभव मगदुम, भारती विद्या पो स्टे कडील सपोनि स्वप्नील पाटील, तपास पथकाचे अधि पोउपनि निलेश मोकाशी, पोलीस अंमलदारमहेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, नवनाथ भोसले, निलेश खैरमोडे, तसेच गुन्हे शाखा २ कडील अंमलदार सपोफौ जाधव, पोहवा शंकर कुंभार, पोहवा आबा मोकाशी, पोहवा विजय पवार, पोहवा शंकर नेवसे, पोहवा विनोद चव्हाण, पोहवा संजय आबनावे, पोहवा ओम कुंभार, पोहवा संतोष टकले, पोहवा राहुल शिंदे, मपोहया साधना ताम्हाणे, पोशिनिखिलजाधव, पोशि सद्दाम तांबोळी, पोशि शुभम देसाई, पोशि मयुर भोसले, पोशि निलेश साबळे, पोशि अमित जमदाडे तसेच धाराशिव एल सी बी चे पोहवा समाधान वाघमारे यांच्या पथकाने केली आहे. मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी सदर प्रशंसनीय कामगीरी बद्दल भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे टीमला १,००,०००/-रु (एक लाख रुपये) व गुन्हे शाखा, पुणे शहर यांना १,००,०००/-रु (एक लाख रुपये) बक्षीस जाहीर केले आहे.
