चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बुधवारी मंत्रालयात बैठक
आमदार बाबाजी काळे यांच्या मागणीची दखल
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निघणार तोडगा
चाकणच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे या भागातील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे, रोज होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. चाकणची वाहतूक कोंडी सोडवल्या जावी, या भागातील रस्त्यांचे प्रश्न सोडवले जावेत यासाठी आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पावसाळी अधिवेशनातही सभागृहात आवाज उठवत आमदार बाबाजी काळे यांनी आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शेळके ,आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांना सोबत घेत सरकार जागे व्हा,चाकणची वाहतूक कोंडी सोडवा असे फलक घेऊन विधानभवनाच्या परिसरात लक्षवेधी आंदोलन केले होते. याची महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे.
चाकणच्या वाहतूक कोंडी संदर्भात बुधवार दिनांक ३० जुलै २०२०रोजी दुपारी १२.३० वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या दालनात,मंत्रालय मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, या बैठकीला उद्योग मंत्री उदय उदयजी सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत महानगर आयुक्त श्री योगेश म्हसे यांनी दिनांक २३जुलै २०२५ रोजी चाकणच्या टॉपिक संदर्भात व रस्त्यांच्या अडचणी बाबत विविध विभागांचा आढावा घेतला, यामध्ये भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण, एमएसआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, जिल्हा परिषद, पीएमआरडीए चाकण नगरपरिषद सह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी सर्व विभागांकडून आढावा घेऊन शासन स्तरावर याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात येत आहे
