अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे हादरले ! पत्नी नांदायला येईना, म्हणून सासरवाडीत जावुन पतीने केली, पत्नीची हत्या
विमाननगर पोलिसांनी आरोपी पतीला ठोकल्या बेड्या
कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी
पुण्यातील खांदवेनगर भागात घरगुती वादांतून पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून. आरोपी पतीला विमाननगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून ही हत्या घरगुती वादांतून आणि पत्नी नांदायला येत नाही याचा राग मनात धरून पत्नीच्या गळ्यावर सपासप वार करीत तिची हत्या केल्याची माहिती समोर आहे. यामध्ये मृत महिलेचे नाव ममता प्रेम चव्हाण (वय 28) असे असून. ती तिच्या मावशीकडे राहत होती. आरोपी प्रेम चव्हाणने घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांकडून सध्या हत्येमागील नेमके कारण शोधण्याचा तपास विमाननगर पोलीस करीत आहेत. प्रेम चव्हाण आणि पत्नी ममता चव्हाण यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वाद सुरू होते. सततचे भांडण आणि तणावामुळे ममता ही माहेरी जाण्यासाठी ऐवजी तिच्या मावशीच्या घरी खांदवेनगर येथे राहत होती. काल अचानक प्रेम चव्हाण घरी गेला होता. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. वादाचा राग इतका वाढला की, प्रेमने जवळच असलेल्या चाकूने ममताच्या गळ्यावर सपासप वार केले, पत्नीच्या हत्येनंतर आरोपी प्रेम चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच विमाननगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने पंचनामा करीत तपास सुरू केला. काही वेळातच आरोपी प्रेम चव्हाणला ताब्यात घेण्यात विमाननगर पोलिसांना यश आले, मात्र पुण्यात दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरांत एकच खळबळ उडाली आहे.*
