खिरोदा प्र,यावल येथील ग्रामपंचायतची घाणीचे साम्राज्य ची बातमी प्रकाशित करुन देखील ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष.
परिस्थिती जैसे थे ,नागरिकांचे आरोग्य धोक्यात
खिरोदा प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील खिरोदा प्र यावल येथील बेघर वस्तीत घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.अनेक दिवसापासून खिरोदा ग्रामपंचायतचे बेघर वस्तीतील होणाऱ्या समस्येमुळे ,बेघर वस्ती मोटकर्यात बाहेर झालेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून , साथीचे आजार पसरत असून,लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .हा संपूर्ण प्रकार ग्रामपंचायत च्या पदाधिकाऱ्यांना माहिती असल्यावरही या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे आणि ,सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी ह्या आरोग्याच्या जबाबदारी पासुन हात झटकत असल्याचे चित्र सध्या जोर धरत आहे.तरी ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ साफसफाई न केल्यास गावकरी मिळून उपोषण करणार असल्याचे परिसरातील जनतेकडुन ऐकण्यास मिळत आहे.तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी ताबडतोब या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या जनतेचे आरोग्य वाचवावे अशी रास्त स्वरुपाची मागणी गावकरी जनतेकडुन करण्यात आली आहे..
