अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मुंबई प्रतिनिधी : गणेश तळेकर
कुंकुमार्चन
मराठमोळं मुलुंड ही संस्था सातत्याने मुलुंडमधील मराठी परंपरा व संस्कृती जपण्याचे कार्य करत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी ” कुंकुमार्चन ” या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले…
“कुंकुमार्चन ” म्हणजेच कुंकवाचा अभिषेक,आपल्या कुलदेवी चे सहस्रनाम घेऊन देवीला कुंकू वाहणे.
कार्यक्रमाची रुपरेषा- दिनांक:२७/७/२०२५ रविवार
वेळ :सकाळी : ८.३० वा
स्थळ -दयानंद वेदिक विद्यालय, देवीदयाल मार्ग,बृहन्मुंबई महानगरपालिका, टी विभाग समोर,मुलुंड पश्चिम.
संस्थेकडून सकाळचा नाश्ता , पूजा साहित्य , व पूजेनंतर भोजन देण्यात आले.हॉलच्या क्षमतेनुसार महिलांना प्रवेश दिला गेला… त्या दिवशी हॉलमध्ये आल्यावर बैठक नंबर देण्यात आली व त्या प्रमाणे आसन व्यवस्था दिली गेली.मंडळा कडून साहित्य दिले गेले :
कुंकू व इतर पूजा साहित्य , फुलवात तूप , एक फळ , एक नारळ , एक पेढा , गजरा , फुल पुडी , अक्षता , विड्याची पाने आणि सुपारी .भगिनींनी आणलेली साहित्य :
दोन ताम्हण , तांब्या , पळी भांडे , चौसर ( कापसाचे वस्त्र ) , निरांजन , अन्नपूर्णा ( पार्वती ) ची मूर्ती , एक रुपयाची पाच नाणी , वर्तमान पत्र , वाटी , रुमाल , काडेपेटी .( ज्यांच्याकडे पार्वतीची मूर्ती नसेल त्यांनी सुपारी वर पूजा केली तरी चालतं.) *कुंकुमार्चन पूजा वर्गणी होती* —रुपये ७०० /- कार्यक्रम सकाळी ८.३० ते ९.३० नाव नोंदणी केली व नाश्ता दिला गेला . (पूजा संपन्न होईपर्यंत उपवास असल्याने नाश्ता उपवासाचाच दिला गेला .) सकाळी ९.३० ते १०.०० गणेश पूजन सकाळी १०.०० वाजता कुंकुमार्चन झाले.१२.०० नंतर आरती व नंतर प्रसादाचे भोजन झाले. प्रसादाच्या भोजना करिता भगिनी व्यतिरिक्त इतर सभासद सहभागी होऊ शकतात त्यासाठी . (सशुल्क- ५०० /-) आहे.या कार्यक्रमात
सर्व भगिनींनी एकत्र पूजा केली असल्यामुळे सर्वजण सकाळी ठीक ८.३० वाजता हजर झाले होते,
खाली नावे दिलेल्या प्रतिनिधींकडे सर्वांनी नावे नोंद केली होती, दिनांक २० जुलै २०२५ पर्यंत नाव नोंदणी केली होती.
या कार्यकामाला सर्वांनी सहकार्य केले त्या बद्दल सर्वांचे धन्यवाद .
आपले नम्र : सौ. मिरा पत्की
(सचिव)
मराठमोळं मुलुंड संपर्कप्रमुख
सौ. पद्मा प्रधान
९८६९०७१९०६
श्रीमती. गिताली देशमुख
९८६९२२४८६६
सौ. सोनी ठाकूर
९८७००७०९०१
सौ.नेहा गोगटे
९८३३१०३१८६
आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.marathmolmulund.org
