अहिल्यानगर ब्रेकिंग
शनिशिंगणापूर देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांची राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या
कलावती गवळी (अहिल्यानगर जिल्हा ) प्रतिनिधी
शनी शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी त्यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी गळफास घेवुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून शनी शिंगणापूर संस्थान हे विविध मुद्द्यांमुळे चर्चेत होतं. विश्वस्त मंडळातील अंतर्गत वाद आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप आणि इतर कारणांमुळे देवस्थान वादांच्या भोवऱ्यात होतं. या घटनेमुळे देवस्थान परिसरांत एकच खळबळ उडाली आहे. शेटे यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. शेटे यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आला ते तणावाखाली असल्याचे बोललं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेवुन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नितीन शेटे यांनी असे टोकाचे पाऊलं का घेतले याचा आता पोलीस करत आहेत. शेटे यांच्या निधनाने देवस्थान आणि प्रशासकीय वर्तुंळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
