अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
रेल्वेच्या संबंधित नागरिकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवेदन.
ठिकाण:-ठाणे,कळवा
प्रतिनिधी:- दौलत सरवणकर
न्यु शिवाजी नगर, कळवा पुर्व पश्चिम रेल्वेच्या पादचारी पुलावर शेड बसवण्यासाठी तसेच सरकता जिना (एस्केलेटर) बसवण्यासाठी, तसेच ठाकुर पाडा न्यु शिवाजी नगर कळवा पुर्व येथील फास्ट रेल्वे लाईन तसेच हर्बर रेल्वे लाईन अंतर्गत गटर नादुरुस्त अवस्थेत आहे तो गटर दुरूस्त होणे आवश्यक आहे या साठी माननीय श्री सचिन पांचाळ वरिष्ठ मंडळ अभियंता (दक्षिण) यांना लेखी निवेदन देण्यात आले निवेदन देताना *शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री चंद्रकांत विधाटे संघटक कळवा मुंब्रा, विधानसभा, तसेच माजी नगरसेविका सौ निलीमा शिंदे समन्वयक कळवा मुंब्रा विधानसभा,श्री मुकुंद रामचंद्र ठाकुर उपशहरप्रमुख कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्र
श्री सुभाष विरकर उपविभाग प्रमुख इंदिरा नगर कळवा पुर्व,श्री प्रकाश मोहीते उपशाखा प्रमुख कळवा (प.), उपस्थित होते
