अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सावदा परिसरातील अवैध धंदे आणि जुगार अड्यांचा महापुर काही थांबता थांबेना जिल्हा पोलिस प्रशासनासमोर आव्हान
बातमी प्रकाशित करुन देखील परिस्थिती जैसे थे
सावदा पोलिसांना झोपेची गुंगारी
जळगांव जिल्हा प्रतिनिधी युनूस तडवी
सावदा परिसरात अनेक महिन्यांपासून जुगार अड्डे वाल्यांनी ही अवैध धंदे बंद न करण्याचे रणशिंग फुंकले आहे की काय? असा प्रश्न सध्या स्थितीत उपस्थित झाला आहे आणि चारही मार्गांवर विषारी कंपन्या कुंडली मारून बसल्या आहे की काय अशी चर्चा परिसरात जोर धरत आहे हे जुगार अड्डे कोचूर रोड,, फैजपूर रोड,, लहान वाघोदा,,स्टेशन रोड गाते,, मोठा वाघोदा रोड वर रोड टच जुगार अड्डयांचा अवैध धंदान्याच्या कंपन्या कुंडली मारून बसल्या आहे यामुळे अनेकांचे संसार फासी घर लोग जाण्याची दाट शक्यता भासू लागली आहे हा जुगार अड्ड्यांच्या कंपन्या अतिशय भयंकर रूप देऊ शकतात जिल्हा पोलिस प्रशासनाने ताबडतोब जागे व्हायची आता गरज आहे असे परिसरातील जनतेकडुन बोलले जात आहे .ह्या जुगार अड्डे अवैध धंद्यांमध्ये व्यसनाधीन करुन आमच्या परिवारांना उध्वस्त करुन टाका तेव्हाच हे धंदे बंद करा
अशा संतप्त प्रतिक्रिया परिसरातील जनतेमध्ये दिसत आहेत तरी जिल्हा पोलिस प्रशासनाने या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देऊन जोरदार खुलेआमपणे सुरू असणारे जुगार अड्डे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी तालुक्याच्या जनतेसह सावदा शहर जनतेची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे रास्त स्वरूपाची मागणी आहे सावदा शहर हा बनाना सिटी म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे परिसरात जुगार अड्डे अवैध धंद्यांना मोठा प्रमाणात आलेला महापुर थांबवावा तसेच सावदा शहर गल्ली गल्ली सट्टा मटका यांची दुकाने रस्त्यावर आहे गावठी दारू च्या दुकाने घरात टपऱ्यात मध्ये चालू आहे या धंद्यांना मोठ्या प्रमाणावर उत आल्याने तरुण पिढीसह वयस्कर मंडळी देखील ह्या लोभा मध्ये बळी पडत असल्याचे चित्र दिसत आहे यामुळे या परिसरात जुगार अड्डे सत्ता मटका अवैध धंदे गावठी दारू हे व्यसन बिनधास्त राजरोसपने सुरू असल्याची चर्चा आता हळूहळू जळगाव जिल्ह्यात देखील चर्चा वाढू लागली आहे या सट्टा मटका दारू जुगारला मोलाचे सहकार्य संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे बालुकास तालुका आणि जिल्ह्यातील जनतेचे म्हणणे आहे असे जनतेकडून ऐकण्यास मिळत आहे या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर अवैध धंद्यांवर जिल्हा पोलीस प्रशासन कारवाही करेल का? असा सवाल मात्र परिसरातील जनतेला आता खूप त्रास देऊ लागला आहे जेणेकरून तरुण पिढी व वयस्कर लोक हे लोभापोटी बळी पडू नये म्हणून तात्काळ या प्रकरणाकडे जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब यांनी गांभीर्याने लक्ष देऊन जुगार अड्डे चालवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे जुगार अड्डे व दारू मध्ये व्यसनाधी झालेल्या सर्व सामान्य जनतेचे जीवन वाचवावे अशी रास्त स्वरूपाची मागणी जिल्ह्यातील,, तालुक्यातील जनतेने जिल्हा पोलीस प्रशासनाकडे केली आहे आणि ह्या संबंधित सुरू असलेले जुगार अड्डे सट्टा मटका पिढ्या गावठी दारू अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे अशी रास्त स्वरूपाची मागणी वरिष्ठ नागरिकांसह परिसरातील जनतेने पोलीस प्रशासनाकडे केली आहे जर पोलीस प्रशासन जुगार अड्डे अवैध धंदे बंद केले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करनार असल्याचे जिल्ह्यातील जनतेचे जिल्हा पोलीस प्रशासनाला आव्हान करण्यात आले आहे
