अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
गुन्हेगारांची कर्दनकाळ धडाकेबाज लेडी सिंघम पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांची ओळख..!!
कलावती गवळी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांची वर्षभरांपूर्वी सातारा ते पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. वृषाली देसाई या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यांतील आहेत. चंदगड तालुक्यांच्या मातीत आई सौ. प्रगती देसाई व वडील अशोक देसाई या दांपत्याच्या पोटी वृषाली देसाई यांचा जन्म सदन कुटुंबात झाला. आई गृहिणी तर वडील बीएसएनएल भारत संचार निगम लिमिटेड येथे शासकीय नोकरी करत होते. ( लहानपणापासूनच ठेवली होती जिद्द ) वृषाली देसाई या लहानपणापासून लढवय्या व जिद्दी होत्या. चांगले शिक्षण घेऊन शासकीय सेवेत जाण्याची जिद्द मनात ठेवली होती तसं लहानपणापासून त्यांच्यावर तसेच संस्कार झाले होते. खांस करून वृषाली देसाई यांना खाकी सेवेची आवड चांगलीच होती. घरात कोणीतरी पोलीस अधिकारी झाले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती व बालपणापासून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण क्षेत्रात हुशार असलेल्या वृषाली देसाई यांनी चंदगड येथे आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण केले शिक्षण पूर्ण होतात वेद होते. खाकी वर्दीचे यासाठी त्यांनी चांगलीच जिद्द मेहनत व तितकाच अभ्यास ठेवत. आपल्या पहिल्याच प्रयत्नात सन 2014 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच ट्रेनिंग साठी नाशिक येथे गेल्या होत्या. आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणून आल्या… ( संवेदनशील मनाची पोलीस अधिकारी ) पहिल्यांदाच सातारा जिल्हा पोलीस दलात त्या रुजू झाल्या होत्या. फलटण ग्रामीण,सातारा तालुका,शिरवळ खंडाळा या पोलीस ठाण्यात आपले कर्तव्य बजवताना वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले, तसेच कोरोनांच्या कठीण काळातही त्यांचे कर्तव्य हे सातारा जिल्ह्यात कौतुकास्पद ठरले, सध्या त्या पुणे ग्रामीण विभागातील राजगड पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. अशा या कर्तव्यदक्ष,शिस्तप्रिय महिला पोलीस अधिकाऱ्याला आमच्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन मानाचा सलाम
