अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
व्यसनाच्या आहारी गेला होता म्हणून भावाला संपविले, ताम्हिणी घाटातील खून प्रकरणाचा झाला उलगडा
वारजे माळवाडी पोलिसांनी भावाला ठोकल्या बेड्या.!!
अनुजा कारखेले-देवरे ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी
राज्यांत सध्या गुन्हेगारी चांगलीच वाढली आहे. राज्यांतील वेगवेगळ्या भागांतून दररोज खून,मारामाऱ्या, लुटमार,दरोडे या सारख्या घटना उघडकीस येत असतात. मात्र महाराष्ट्रांतील पोलीस प्रशासनही तितकेच प्रयत्नशील, आहे. अशातच आता पुण्यातून दोन दिवसांपूर्वी ताम्हिणी घाटातील खुनाचा गुन्हा उघड करण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश मिळाले आहे. ताम्हिणी घाटात आढळून आलेल्या अनोखी तरुणाच्या हत्येचा अखेर तपास उलगडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणात वारजे माळवाडी पोलिसांनी खून झालेल्या तरुणाच्या मोठ्या भावाला बेड्या ठोकल्या आहेत. ऋषिकेश अनिल शिर्के (वय 23) रा. गायकवाड चाळ कर्वेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर ऋषिकेशचा मोठा भाऊ अनिकेत अनिल शिर्के (वय 26) याला अटक करण्यात आली आहे. आपला लहान भावाच्या व्यसनाधीनमुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. आणि याच वादांतून त्याने आपल्या लहान भावाचा खून केला होता. तपासाच्या अनुषंगाने आरोपीला भावाला ताब्यात घेतल्यानंतर आरोपी अनिकेतने अखेर खूनाची कबुली पोलिसांना दिली आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पौंड पोलीस करीत असून परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे गुन्हे पोलीस निरीक्षक निलेश बडाख आदीं पोलिसांनी या खुनाच्या तपासात सहभाग घेवुन तपास पथकांने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे.
