अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
स्त्री अन्याय आणि सशक्ततेवर आधारित दोन नवे एकांकिका प्रयोग | ‘EchoRang Productions’ ची नव्याने रंगभूमीवर एंट्री
प्रतिनिधी -सारंग महाजन
पुणे – शहरातील नव्या दमाची नाट्यसंस्था ‘EchoRang Productions’ लवकरच रंगभूमीवर दोन एकांकिकांमधून आपली निर्मिती सादर करत आहे. ‘जन्मांतर’ आणि ‘नियतीचा खेळ’ या दोन एकांकिका स्त्रियांवरील सामाजिक अन्याय, मानसिक वेदना आणि त्यांच्या सशक्ततेची कथा सांगतात.या दोन्ही प्रयोगांतून केवळ मनोरंजन न करता, समाजप्रबोधन करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. आजच्या काळात स्त्रीजीवनातील संघर्ष, अस्वस्थता आणि अस्तित्वाच्या लढ्याला न्याय देणाऱ्या कलाकृतींची नितांत गरज आहे, हे या निर्मितीतून प्रकर्षानं जाणवतं.
या दोन एकांकिका २९ जुलै रोजी, सायंकाळी ५ वा. पुण्यातील भारत नाट्य मंदिरात सादर होणार आहेत. नव्या कलाकारांची चमकदार टीम, तरुण दिग्दर्शकांची वेगळी मांडणी आणि सच्च्या कहाण्यांचा आधार — ही या निर्मितीची खरी ताकद आहे.
EchoRang Productions या नव्या संस्थेचा उद्देश नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सामाजिक विषयांवर विचारप्रवृत्त करणाऱ्या कलाकृती सादर करणे हाच आहे.
