अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुण्यात घरफोड्या करणाऱ्या आणि सराईत गुन्हेगारांच्या लष्कर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, लष्कर पोलिसांची दमदार कामगिरी
आरती पाटील ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी
राज्यांत घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लष्कर तसेच कोंढवा भागात बंद घरे फोडणाऱ्या आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे. लष्कर पोलिसांनी ही कारवाई केली असून दोन गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे दोन गुन्हेगार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत आर्यन अजय माने उर्फ मॉन्टी (वय 21) रा. फुरसुंगी ) विशाल मारुती आश्चर्य (वय 25) रा. रामटेकडी) आणि ओंमकार सुरेश गोसावी (वय 22 ) रा. फुरसुंगी ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीषकुमार दिघावकर पोलीस निरीक्षक प्रदीप पवार पोलीस उपनिरीक्षक राहुल गाडगे रमेश चौधरी व त्यांच्या पथकांने केली आहे. आर्यन माने व ओंकार गोसावी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारी आहेत त्यांच्यावर हडपसर वानवडी व लोणीकंद या पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या पुणे शहरांत वाढत्या गुन्हेगारी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांना पायाबंद घालण्यासाठी पोलिसांकडूंन गस्त व पेट्रोलिंगवर भर दिला जात आहे. दरम्यान लष्कर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये एका ऑफिसमध्ये घुसून चोरी झाली होती. या गुन्ह्याच्या तपास सुरू असताना पोलिसांनी सी.सी.टीव्हीच्या पडताळणी केली त्यामध्ये हे तिघेजण आरोपी कैद झाले होते. माहिती घेत असताना पोलीस अंमलदार सागर हराळ व लोकेश कदम यांना आरोपीबाबत माहिती मिळाली त्यानुसार या तिघां आरोपींच्या लष्कर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अधिक तपास लष्कर पोलीस करीत आहेत.
